व्यसनाच्या आहारी गेल्याने तरुणी पिढी होतेय बरबाद
लांजा( प्रतिनिधी) तालुक्यातील साटवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्यासह गावठी दारूचा महापूर आला आहे. यातूनच तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाचे आहारी जात असून अनेकांचे संसार देखील उघड्यावर पडले आहेत .त्यामुळे या दारू धंद्यांवर लांजा पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी येथील जनतेतून केली जात आहे.
लांजा तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेल्या साटवली गावात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गावठी दारूसह देशी विदेशी मद्याचा मोठ्या प्रमाणात महापूर आला आहे .यापूर्वी लांजा पुलिसांनी डिसेंबर महिन्यात या ठिकाणी कारवाई करीत मोठ्या प्रमाणात दारुसाठा जप्त केला होता. त्यामुळे साटवली भागात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले होते. मात्र यानंतर पुन्हा एकदा साटवली गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. देशी- विदेशी ,गोवा बनावटीच्या दारू दारूसह गावठी हातभट्टीच्या दारूची देखील मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या व्यसनाच्या आहारी जाऊन भरकटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आधीच कोरोना नंतर अनेकांचे व्यवसाय उद्योगधंदे आणि नोकऱ्या अडचणीत आलेल्या असताना आता तरुण पिढी ही मद्याच्या आहारी जात असल्याने कुटुंबीय देखील हैराण झाले आहेत. अनेकांचे संसार या व्यसनापाई बरबाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आणि म्हणूनच अशा तरुणाईला बिघडवणाऱ्या आणि संसार मोडू पाहणाऱ्या या गावठी दारू आणि मद्याच्या महापुरावर लांजा पोलिसांनी कठोरातकठोर कारवाई करावी अशी मागणी आता साटवली परिसरातील ग्रामस्थांतून केली जात आहे.
_______________________________________