राजापूर -लांजा तालुका नागरिक संघाचे वृक्षारोपण संपन्न

वाटूळ -दाभोळे रस्त्यावर व्हेळ तिठ्यावर करण्यात आले वृक्षारोपण

लांजा (प्रतिनिधी) राजापूर -लांजा तालुका नागरिक संघाचे वतीने वाटूळ -दाभोळे रस्त्यावर व्हेळ तिठा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कोकणात रस्ते रूंदीकरणाचे काम चालले असून त्या विकासापायी लाखो वृक्षांची कत्तल झाली आहे .कोकणातल्या रस्त्यावरून एप्रिल मे महिन्यात प्रवास करतांना आपण वाळवंटात तर आलो नाही ना अशी शंका येण्याइतके रस्ते विराण वाटू लागले आहेत.
यावरून वृक्ष लावण्याची व संवर्धन करण्याची किती गरज आहे हे लक्षात येईल.
वाटूळ -दाभोळ रस्त्याचे काम सुरू होवून
पूर्णत्वास गेले आहे .या रस्त्याच्या दुतर्फा ठेकेदार कंपनी झाडे लावते आहे.तरीही संघाने त्यात आपला वाटा उचलताना आपल्या मातीतीलच झाडे लावावी हे दाखविण्यासाठी संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी व्हेळ तिठ्यावरून जाणा-या रस्त्यावर गावठी काजू १०० झाडे तसेच फणस ,आंबा ,पिंपळ, वड या वृक्षांची लागवड करण्यात आली
लावली.कृषीरत्न पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी अमर खामकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.लांजा शाखेचे अध्यक्ष- किरण बेर्डे ,राजापूर शाखेचे अध्यक्ष – महादेव पाटील, महेंद्र साळवी,विजय हटकर यांच्या सोबत प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.दत्ताजी कदम व संघाचे पर्यावरण समितीचे प्रमुख चंद्रकांत खामकर हे उपस्थित होते.