योजनाचां जागर पिकुळेत कार्यक्रमांत आवाहन
दोडामार्ग | सुहास देसाई : विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना अधिकाधिक विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून त्यांची अमलबजावणीसाठी सरकारचा उपक्रम स्तुस्त आहे याचा लाभ पालकांनी पुढाकार घेऊन विध्यार्थी वर्गाला सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पिकुळे प्रशालेचे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुभाष गवस यांनी केले श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेत आज शिक्षक पालक संघाची सभा नुकतीच पार पडली या बैठकीत योजनांच्या अंमलबजावणीसाठी जागर कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अनेक योजना राबविल्या जातात त्यांची माहिती पालकांना दिली यावेळी शिक्षक परेश देसाई यांनी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी झरेबांबर सरपंच तथा शालेय समिती सदस्य अनिल शेटकर माजी उपाध्यक्ष महादेव नाईक जेष्ठ पालक महादेव नाईक आदीं उपस्थित होते यावेळी शिक्षक पालक संघाची निवड करण्यात आली यामध्ये उपाध्यक्ष म्हणून सुभाष कृष्णा गवस सदस्या म्हणून सौ. सेजल सुजय गवस, प्रेमानंद तळणकर, मनोहर सखाराम गवस, सुहानी सुनील गवस, भानुदास गणू शेटकर, समीक्षा सुंदर नाईक, प्रशांती पाडूरंग जाधव आदीं ची निवड बैठकीत करण्यात आली यावेळी प्रस्तावना एन पी कांबळे यांनी केली तर अहवाल वाचन अनुजा सावंत यांनी केले तर जिल्हा परिषद योजना राबविल्या जातात त्यांची माहिती सुहास देसाई यांनी विद्यार्थी व मुलींना मोफत प्रवास शिष्यवृत्ती योजना आदी माहिती सविस्तर दिली यावेळी नूतन पालक शिक्षक कार्यकारिणी सदस्य यांचे गुलाब पुष्प देउन अभिनंदन केले यावेळी मोठ्या प्रमाणात पालक माता भगिनी उपस्थित होत्या यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापीका स्नेहल गवस यांनी प्रशालेत येणाऱ्या अडचणी सोडविल्या जाव्यात यासाठी ग्रामस्थ व पालक यांनी सहकार्य करण्याचं आवाहन केले यावेळी पालक संघाचे उपाध्यक्ष सुभाष गवस यांनी प्रशालेत येणाऱ्या अडचणी सोडविल्या जातील यासाठी येथील पालकाचे सहकार्य नेहमीच राहील आपण विद्यार्थी विद्यार्थिनी यांना पोषक वातावरण निर्मिती करून यश संपादन करावे अशी ग्वाही पालकांचा वतीने दिली आहे