अंशतः अनुदानित शिक्षकांना दिवाळी पूर्वी टप्पा वाढीने वेतन द्या

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,मा.आ श्रीकांत देशपांडे आक्रमक

गौरव पोंक्षे. माखजन
महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांना १ ऑगस्ट २०२५ पासून २०% टप्पा वाढ देण्यात आली.तसा शासन निर्णय झाला.व शिक्षण उपसंचालकवा शिक्षणाधिकारी यांनी २०% वाढीव अनुदानासाठी पात्र शाळा,कनिष्ठ महाविद्यालये घोषित केली.
संपूर्ण प्रक्रिये शासन फक्त कागदावर टप्पा वाढ देताना दिसत असल्याने,कोकण विभागीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि अमरावती विभागाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे आक्रमक झाले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांना वाढीव २०% देण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.कोणतीही अडचण नाही असे घोषित केले होते.मग माशी शिंकते कुठे असा सवाल उपस्थित करत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व मा.आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षण व अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.शासनाच्या घोषणेप्रमाणे अंशतः अनुदानित शिक्षकांना वेळेत निधी का मिळत नाही?याला जबाबदार् कोण असा सवाल उपस्थित केला आहे.
शिक्षण खात व अर्थ खात टोल्वा टोलवी करत असल्याने अंशतः अनुदानित शिक्षक ३महिने झाले तरी लाभापासून वंचित आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणांवर व शासन निर्णयावर शिक्षकांनी कसा विश्वास ठेवायचा असा सवाल अंशतः अनुदानित शिक्षक. विचारात आहेत.
कोणत्याही परिस्थित शिक्षण विभागाने,व अर्थ विभागाने निधी जिल्ह्यांना सोडून अंशतः अनुदानित शिक्षकांचा पगार दिवाळी पूर्वी वाढीव टप्प्याने करावा अशी आक्रमक मागणी आ.ज्ञानेश्वर म्हात्रे व मा.आम श्रीकांत देशपांडे यांनी केली आहे.
निर्णय झालेला असताना त्याची अमलबजावणी व कार्यवाही होत नसल्याने शासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्प्याने दिवाळी पूर्वी पगार दिल्यास,शिक्षकांना गेल्या २५ वर्षात साजरी न केलेली दिवाळी आनंदाने साजरी करता येईल.अर्धपोटी काम करणाऱ्या शिक्षकांना शासनाने न्याय दिलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया आम.ज्ञानेश्वर म्हात्रे व मा.आम.श्रीकांत देशपांडे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.