वैभववाडी l प्रतिनिधी : भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या निंदनीय भ्याड हल्ल्याचा वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ ग्रामीण व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच भ्याड हल्ला करणाऱ्या वकिलावर कडक कारवाई करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे तहसीलदार वैभववाडी यांच्यामार्फत करण्यात आली.
नुकताच भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या बाबतीत झालेला प्रकार अत्यंत निंदनीय असून सदर वकील राकेश किशोर यांचा आम्ही निषेध करत असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्ष भास्कर जाधव, महिला मंडळ अध्यक्ष शारदा कांबळे, रविंद्र पवार, उपाध्यक्ष संतोष कदम, राजेंद्र कांबळे, सहसचिव शरद कांबळे, दिलीप यादव, सुहास जाधव, स्नेहा जाधव, नवेली जाधव, जोत्स्ना जाधव, वैष्णवी जाधव, मंगेश कांबळे, अर्जुन कदम, सुमन कदम, उर्मिला जाधव,संजीवनी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.











