चिपळूण (वार्ताहर) : मार्गताम्हणे एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विषयाचे विभाग प्रमुख प्रा. रामचंद्र माने यांना मुंबई विद्यापीठाकडून हिंदी विषयातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व माजी आमदार श्री. मधुकरराव चव्हाण, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव , पीएचडी चे शोधनिर्देशक प्रोफेसर डॉ. विद्या शशीशेखर शिंदे (आय.सी.एस. महाविद्यालय, खेड), डॉ.नातू कॉलेजचे हिंदी विभाग सदस्य प्रा.युवराज जाधव, प्रा. संयोगिता माळी, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी, परिसरातील नागरिक यांनी अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयात १५ जुलै १९९४ पासून हिंदी विषयाच्या अध्यापनासाठी कार्यरत असणारे डॉ रामचंद्र माने गेल्या ३१ वर्षापासून हिंदी विषयाचे ज्ञानदान करीत आहेत. त्यांनी आर.के. तलरेजा महाविद्यालय, उल्हासनगर, मुंबई या मुंबई विद्यापीठाच्या संशोधन केंद्रामध्ये डॉक्टर विद्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.चे संशोधन केले. त्यांचा पीएचडी संशोधनाचा विषय ” संजीव के उपन्यासों में चित्रित समस्याएं” हा होता. डॉ. माने यांनी हिंदीतील प्रसिद्ध उपन्यासकार संजीव यांच्या उपन्यासांचा गाढा अभ्यास केला असून त्यांच्या संशोधन पर विषयाचा समाजातील प्रत्येक हिंदी प्रेमी संशोधक घटकाला उपयोग होणार आहे. याबद्दल मुंबई विद्यापीठाचे मानव्य विद्याशाखाचे अधिष्ठाता डॉ. अनिल सिंह, हिंदी अध्ययन मंडळाचे अध्यक्ष डॉ.संतोष मोटवानी ,अभ्यास मंडळातील शिक्षणप्रेमी यांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे. मुंबई विद्यापीठातर्फे दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी आयसीएस महाविद्यालय, खेड येथे या प्रबंधावर आधारित आभासी मंचातर्फे मौखिक परीक्षा घेण्यात आली.
यावेळी अध्यक्ष ,रूईया कालेज, मुबंई चे प्रो.डॉ. महालिंगे व बाह्य परीक्षक शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर चे प्रो.डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या उपस्थितीत ही मौखिक परीक्षा सफलतापूर्वक घेण्यात आली. शेवटी अध्यक्षांनी रामचंद्र माने यानी सादर केलेल्या प्रबंधास पी.एच.डी. पदवी प्रदान करण्याची शिफारस केली.यावेली श्री.व सौ.रामचंद्र माने यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना सहजीवनच्या प्राथमिक विभागाचे संचालक व आय.सी.एस.कालेज चे अधीक्षक श्री.डी.एम.शिंदे, आय.टी.विभाग समन्वयक डॉ.सचिन भोसले,पी.एच.डी.मार्गदर्शक प्रो.डॉ.विद्या शिंदे, डॉ. पटेल उपस्थित होते. या मौखिक परीक्षेसाठी सहजीवन चे कार्याध्यक्ष मा.मंगेशभाई बुटाला,चेअरमन मा.आनंदराव भोसले व इतर सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या असून डॉ.माने यांच्या या अभ्यासपूर्ण संशोधनाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. रामपूर मार्गताम्हाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे माजी अध्यक्ष व सल्लागार अनिलकुमार जोशी यांनीही अभिनंदन केले आहे.











