नागरिक शास्त्रात ‘परिसर शिस्त’ उपक्रमाचा विद्यार्थ्यांसाठी समावेश करावा

 डॉ. निला विवेक नातू यांचे प्रतिपादन
चिपळूण (वार्ताहर) : आपल्या भारत देशात घाणीचे, रुगराईचे, अस्वच्छतेचे प्रमाण भरपूर आहे. ग्रामपंचायत स्वच्छता अभियान नावापुरते आहे. देशात रस्त्यात, रेल्वे, विमान, एस.टी. घाणीचे साम्राज्य असते. शहरात, गावात, सार्वजनिक ठिकाणी एस.टी स्टँड, शौचालये, स्वच्छतागृहात घाण असते. रस्त्यात लोकं थुंकतात. देशात शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र या विषयात सरपंच, पंतप्रधान यांच्या कर्तव्यापेक्षा, नागरिकांचे कर्तव्य काय? यावर परिसर शिस्त अभ्यासक्रमात समावेश करावा, असे प्रतिपादन डॉ. निला विवेक नातू यांनी केले.
कचऱ्याचे ढीग असतात, घाण असते, यावर लहान विद्यार्थ्यांना बालवाडीपासून शौचालये, स्वच्छतागृह पाणी टाकून स्वच्छ करण्याची मानसिकता तयार करणे काळाची गरज आहे. हा एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे. राज्या-राज्यात स्वच्छता मंत्रालय विभाग असावा. कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येकांना पिशवीचा उपयोग करावा. तरच रोगराई दूर होईल, स्वच्छता आरोग्य संस्कार होतील असे नागरिक शास्त्रात उल्लेख करण्याचे प्रतिपादन डॉ. निला विवेक नातू यांनी व्यक्त केले.