गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माखजन चे सचिव दीपक पोंक्षे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशालेतील उच्च माध्यमिक विभागात काम करणारे माजी मुख्याध्यापक प्रा मनोजकुमार नार्वेकर व प्रा गौस मुल्ला यांनी आपले वडील कै.विश्वनाथ गणपत नार्वेकर,व पैगंबरवासी दादासो दस्तगीर मुल्ला यांच्या स्मरणार्थ संस्थेतील एका ज्येष्ठ संचालकाचा प्रतिनिधिक स्वरुपात सन्मान व्हावा यासाठी ट्रस्ट ठेवला आहे.प्रत्येक शैक्षणिक संस्थेचे काम पाहणारे संचालक हे आपापल्या परीने शैक्षणिक संस्थेच्या नाव लौकिकात भर घालण्यासाठी प्रयत्न करत असतो.ग्रामीण विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे यासाठी झटत असतो.प्रत्यक्षात अध्यापनांचे काम करत नसले तरी,शैक्षणिक संस्थेच्या उन्न्नती साठी सदैव झटणाऱ्या संचालकांनाच सन्मान करण्याची वेळ विरळाच येते.या संचालकांचा सन्मान व्हावा यासाठी प्रा मनोजकुमार नार्वेकर व प्रा गौस मुल्ला यांनी आपल्या पित्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा ट्रस्ट ठेवला आहे.
दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी संस्थापक दिनी या ट्रस्ट तर्फे हा पुरस्कार,प्रातिनिधिक स्वरुपात एका संचालकांना दिला जाणार आहे.
यावर्षी माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व ज्येष्ठ संचालक दीपक कृष्णाजी पोंक्षे प्रमुख पाहुणे ॲड बाळकृष्ण ओक यांचे हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्था उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,शाळा समिती अध्यक्ष मनोज शिंदे, सहसचिव दीपक शिगवण,संचालक सुभाष सहस्त्रबुद्धे,हनीफ म्हाते,राजेश फणसे,श्रीकांत फाटक,मुख्याध्यापक महादेव परब,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव पोंक्षे याने केले.