जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत लालबहादूर हायस्कूल चा विद्यार्थी तृतीय

मंडणगड : 
येथील मंडणगड तालुका विकास मंडळ, मंडणगड. संचलित लालबहादूर शास्त्री हायस्कूल, दहागाव, या प्रशालेतील विद्यार्थी कुमार माधव महेश पवार इयत्ता दहावी ब मध्ये शिकणारा, यांने डेरवण येथील क्रीडा संकुलामध्ये, झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत, ” हातोडा फेक ” या क्रीडा प्रकारात भाग घेतला होता. या स्पर्धेत जिल्हाभरातून एकूण बारा स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये कुमार माधव पवार यांने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना, तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्याला प्रशालेतील कुशल क्रीडाशिक्षक श्री. मनोज चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी आज गुलाब पुष्प देऊन त्याचे अभिनंदन केले. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे परिसरातून त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.