वेंगुर्ले येथे २२ ते २४ ऑक्टोबर ला ‘दीपावली शो टाईम २०२५’ चे आयोजन 

वेंगुर्ले l प्रतिनिधी :रामेश्वर भक्त मंडळ, वेंगुर्ले आणि संदेश निकम मित्रमंडळ, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे २२ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत ‘दीपावली शो टाईम २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे.

वेंगुर्ले शहरातील श्री देव रामेश्वर मंदिर समोरील शाळा नं. १ चे पटांगण येथे तिन्ही दिवस सायंकाळी ७.०० वाजल्या पासून चालणाऱ्या या शो टाईम मध्ये बुधवार दि. २२ ऑक्टोबर रोजी अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण या कंपनीचे “लेक माझी तुळजाभवानी” हे दशावतारी नाटक सादर होणार. गुरुवार दि. २३ ऑक्टोबर रोजी ओमकार नटेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ कालेली या कंपनीचे “गरुड नंदी संग्राम” हे दशावतारी नाटक सादर होणार. आणि शुक्रवार दि. २४ ऑक्टोबर रोजी लक्षवेधी ठरलेल्या दांडीया ग्रुपचे “दांडिया नृत्य” सादर होणार आहेत. तरी या दीपावली शो टाईम कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रामेश्वर भक्त मंडळ, वेंगुर्ले आणि संदेश निकम मित्रमंडळ, वेंगुर्ले यांच्या वतीने करण्यात आले आहे.