पत्नीनेच पतीला विषारी औषध प्राशन करून मारले

मुलाच्या नातेवाईकांनी उत्तरप्रदेश येथे केलेल्या तक्रारीचा रत्नागिरीत तपास सुरु

रत्नागिरी : प्रतिनिधी
उत्तरप्रदेश येथून कामानिमित्त रत्नागिरी दाखल झालेल्या पत्नीने पतीला विषारी पदार्थ पाजून मारल्याची तक्रार झिरो नंबरने ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली असून संशयित पत्नीसह अन्य दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक महिला. मनीराम कल्लूराम ( ४५), मनीराम यांची पत्नी (नाव माहित नाही. ४०, रा. बरसोला कला, तिकोनियॉ. जिल्हा खीरी, राज्य उत्तर प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना २० जूनला घडली आहे.
फिर्यादी श्रीराम श्रीपाल निवास ( ४५, रा. बरसोला कला, तिकोनियॉ, जिल्हा-खीरी, राज्य-उत्तरप्रदेश ) यांचा मुलगा मयत भानुप्रताप रामनिवास याचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांची सुन भांडखोर स्वभावाची होती ती फिर्यादी याचा मुलगा भानूप्रताप याचेशी नेहमी भांडत असे. दरम्यान,संशयित मनीराम कल्लुरामच्या सांगण्यावरुन फिर्यादीचा मुलगा भानुप्रताप व त्याची पत्नी असे दोघेही कामासाठी रत्नागिरी आले होते. त्यानंतर फिर्यादी-श्रीराम निवास यांनी संशयित मनीराम याला वारंवार फोन करुन मुलाची विचारफूस करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने तसेच सुनेने आपल्या पतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
दरम्यान २० जून २०२५ ला संशयित मनिराम याने फिर्यादी श्रीराम निवास यांना फोन करुन कळविले की, त्यांचा मुलगा आजारपणामुळे मरण पावला.तरी संशयित मनिराम याने त्याची पत्नी (पूर्ण नाव माहित नाही) आणि फिर्यादी यांची सून यांनी त्यांचा मुलगा भानुप्रताप रामनिवास यास विषारी पदार्थ पाजून मारले आहे असा संशय व्यक्त करुन तशी तक्रार फिर्यादी-श्रीराम निवास यांनी २३ जून २०२५ ला तिकोनियॉ पोलिस ठाणे, जिल्हा खिरी, राज्य उत्तर प्रदेश येथे दिली होती. तक्रारीवरुन तेथील पोलिसांनी संशयितांविरुद्ध तिकोनियॉ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीचे झिरो नंबरने कागदपत्र शनिवारी (ता. १८) ऑक्टोबरला ग्रामीण पोलिस ठाण्यात प्राप्त झाले. यावरुन ग्रामीण पोलिसांनी संशयित उत्तर प्रदेशमधील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.