मुख्याध्यापिका व आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त श्रीमती.माधवी पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
आबलोली (वार्ताहर) गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडली नं.४, केंद्र- पडवे उर्दू येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,चालू घडामोडींची विद्यार्थ्यांना दररोज माहिती मिळावी विद्यार्थ्यांना सुजाण आदर्श नागरिक घडण्यासाठी प्रेरणा मिळावी व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी या उदात्त हेतूने शाळेमध्ये दैनंदिन वृत्तपत्र वाचन उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका व जि. प.आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त श्रीम.माधवी पाटील यांच्या प्रेरणेतून नुकताच सुरू आहे या स्तुत्य उपक्रमाचे कुडली परिसरातून सर्वच स्तरातून कौतूक करण्यात येत आहे
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.प्रबोध जाधव, माजी अध्यक्ष श्री.अनिल जाधव, श्री.भरत जाधव, उत्कृष्ठ लेखणिक श्री. नंदकुमार जाधव, शिक्षणप्रेमी अमित मोहिते, उपाध्यक्षा सौ. आकांक्षा जाधव, ग्रामपंचायत सदस्या सौ .निकित जाधव या सर्वांनी या स्तुत्य आणि विद्यार्थांना प्रेरणादायक उपक्रमाचे विशेष कौतुक करुन सहकार्य केले आहे
या प्रसंगी गुहागर तालुका बीट विस्तार अधिकारी श्री.अशोक गवाणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व वाचनाचे महत्त्व पटवून दिले. एमपीएससी व यु.पी.एस.सी. या सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी पेपर वाचन उपयुक्त असल्याचे सांगितले यावेळी आबलोली बीटाचे माजी विस्तार अधिकारी श्री.जंगम यांनी विद्यार्थ्यांकडून पेपर वाचन करुन घेतले तर अडूर बीटाचे विस्तार अधिकारी श्री.गोखले यांनी सकाळ पेपर मधील प्रश्नमंजुषा घेवून सामान्य ज्ञाना चे महत्व सांगितले त्यानंतर महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व पडवे उर्दु केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. सुहास गायकवाड यांनी वाचनाचे महत्व सांगताना वाचनाने व्यक्ती समृध्द होते. वाचाल तर वाचाल हा मंत्र विद्यार्थांना सांगीतला यावेळी शाळेतील उपशिक्षक श्री .अजित पाटील व श्री विराज सुर्वे यांचेसह विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते