भगवती एंटरप्रायझेस या नागरी सुविधा केंद्राचा एड. जमीर खलिफे यांच्या हस्ते शुभारंभ

राजापूर (वार्ताहर): शहरानजीकच्या शिळ गावच्या माजी सरपंच सौ.सुप्रिया पेडणेकर यांची कन्या प्रेरणा संजय पेडणेकर यांच्या शहरातील मुख्य मार्गावरील भगवती एंटरप्रायझेस या नागरी सुविधा केंद्राचा शुभारंभ नुकताच राजापूरचे माजी नगराध्यक्ष एड. जमीर खलिफे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.

शहरातील जकातनाका ते जवाहरचौक या मुख्य मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन समोर हे सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी प्रकाश चव्हाण, सौ. सुप्रिया पेडणेकर, शिळ सरपंच अशोक पेडणेकर, सेवानिवृत्त शिक्षक दिलीप मठकर, संदीप मालपेकर, विनय गुरव, एड. मिलिंद चव्हाण, नसिम मालिम, भाजपाचे अनिलकुमार करंगुटकर, संजय पेडणेकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तर या प्रसंगी दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देवून कु. प्रेरणा यांना त्यांच्या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिले. या भगवती एंटरप्रायझेसच्या माध्यमातून खरेदीखत, गहान खत, साठे खत, मुख्यत्यारपत्र, सर्च रिपोर्ट, वारस तपास, हक्कसोडपत्र, बक्षीस पत्र, मराठी इंग्रजी टायपिंग, झेरॉक्स, विविध दाखले, ऑनलाईन सात बारा आठ अ अशी विविध कामे करून दिली जाणार आहेत.