चिपळूण (वार्ताहर) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका मांडली. त्यानंतर राजकीय हालचाली वेगात वाढल्या स्थानिक पुढाऱ्याने कंबर कसली. तर वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन दौरे सुरू झालेत. युती ही स्वबळ यांचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच रिपाई (आठवले गट) महाराष्ट्र संघटक संदेश मोहिते यांनी आपली भूमिका जाहीर करून टाकली आहे. रत्नागिरी जिल्हा रिपाई महाराष्ट्र संघटक संदेश मोहिते यांनी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अनुषंगाने पत्रकारांशी फोनद्वारे चर्चा केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात होऊ घातलेल्या संभाव्य जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वतंत्ररीत्या लढणार असून कोणत्याही प्रकारची युती कोणत्याच पक्ष सोबत करण्यात येणार नसल्याचे श्री. मोहिते यांनी सांगितले. याच अनुषंगाने सर्व जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्यात आढावा बैठकीचे आयोजन करून इच्छुक उमेदवार चाचपणी आणि निवडणुकीचे जिल्हास्तरीय नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र संघटक संदेश मोहिते पुढील आठ दिवसात चिपळूण येथे आढाव बैठक आयोजित करून राज्य समितीकडून देण्यात आलेल्या सूचनांची माहिती देण्यात येणार आहेत. यासोबतच उपस्थित पदीधिकाऱ्यांना आपली मते मांडण्याची संधी देऊन, इच्छुक उमेदवारांना आपापले प्रभाग क्षेत्र निश्चित करून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे स्पष्ट केले. तसेच शहर व तालुका कार्यकारिणीच्या संघटनात्मक बांधणी करण्यात येणार असल्याची श्री.मोहिते यांनी जाहीर केले.










