लांजा (प्रतिनिधी ) : लांजा तालुका कुंभार समाज युवा आघाडीचे अध्यक्ष पंढरीनाथ मायशेट्ये यांचा रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज संघटनेच्या वतने नुकताच सत्कार करण्यात आला.
लांजातील युवा उद्योजक आणि हॅप्पी पंजाबी ढाबा चे मालक असलेले पंढरीनाथ माय शेट्ये हे शहर आणि तालुक्यातील सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी आहेत. नुकताच त्यांना उद्यमश्री रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. या पुरस्काराबद्दल रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज संघटनेच्या वतीने पंढरीनाथ मायशेट्ये यांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज संघटक नाना पालकर, निलेश कुंभार , जिल्हा युवा अध्यक्ष महेश पडवेकर, सचिव सुधीर जामसुतकर, अमित बुरबाडकर, विनोद सावरटकर, अनिल पडवेकर संगमेश्वर युवा आघाडी अध्यक्ष प्रथमेश साळवी, सचिव प्रणय कुंभार, खजिनदार गणेश साळवी आणि समाजबांधव उपस्थित होते.











