पोईप येथे नाथ पंथी गोसावी महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न
मसुरे | झुंजार पेडणेकर
मालवण तालुक्यातील पोईप खालची पालव वाडी येथे नाथपंथी गोसावी महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात संपन्न झाला. या वेळी कोल्हापूर, मलकापूर, सांगली,गोवा सह इतर भागातील शिष्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. तृतिय गोपाळ महाराज यांच्या अधिपत्याखाली सकाळी प्रतिमा पालखी मिरवणूक, नंतर सहस्त्र नामावळ, वेद नारायण पुजा, दर्शन सोहळा, हरी पाठ , ग्रंथ वाचन,दींडी इत्यादी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. हा उत्सव दरवर्षी शुक्लपक्ष कार्तिक शुद्ध दशमीला साजरा केला जातो. यावेळी गोवा मठाचे सखाराम पेडणेकर, कोल्हापूर मलकापूर मठाचे पांडुरंग मावळे आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते.











