जय हनुमान कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ खेर्डी शिगवणवाडीच्या वतीने संतोष कुळे यांचा सन्मान

चिपळूण : तालुक्यातील जय हनुमान कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ खेर्डी शिगवणवाडी मंडळाच्या वतीने महात्मा गांधी पीपल्स अवॉर्ड कौन्सिल महाराष्ट्र यांच्या वतीने पत्रकार संतोष कुळे यांना महाराष्ट्र समाज किर्ती पुरस्कार आणि ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षण संस्था, सामाजिक विभाग आणि भारत नीती आयोग यांच्या वतीने इंदिरा गांधी राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
गेली अनेक वर्षे सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणारे पत्रकार संतोष कुळे यांच्या कामाची दखल घेतली जात आहे. त्यांनी समाजपयोगी कामे केल्याने त्यांचा अनेक संस्था आणि संघटना यांनी गौरव केला आहे. नुकताच त्यांना मिळालेल्या दोन पुरस्काराबद्दल जय हनुमान कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ खेर्डी शिगवणवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी अनंत आदवडे, मनोहर शिगवण, पांडुरंग शिगवण, मारुती शिगवण, सुधीर शिगवण प्रकाश शिगवण, संतोष शिगवण, संजय शिगवण, सुरेश जडे, संजय घाणेकर, विपुल जाबरे, रुपेश शिगवण, सचिन शिगवण, दर्शन शिगवण हे ग्रामस्थ उपस्थिती होते.