हिंदळे येथील आरोग्य शिबीराचा 45 जणांना लाभ!

मसुरे | झुंजार पेडणेकर :            ग्रामपंचायत हिंदळे आणि हिंदळे ग्रामोन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यामंदिर सभागृह वाचनालय हिंदळे भंडारवाडा येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा 45 जणांनी लाभ घेतला. यावेळी

डॉ. प्रशांत मडव (मधुमेह विशेष तपासणी),

डॉ गार्गी ओरसकर

यांच्याकडून रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार करण्यात आले. यावेळी मोफत रक्त तपासणी, इसीजी, ब्लड प्रेशर, शारीरिक तपासणी, मधुमेह, हृदयविकार मोफत सल्ला, आहार संदर्भात मार्गदर्शन, रक्त कमी असलेल्या रुग्णांना मोफत आहार सल्ला देण्यात आला. सरपंच मकरंद शिंदे, रुपेश राणे, दयानंद तेली, मनोहर राणे, सुरेश हिंदळेकर, रघुनाथ तेली, नंदकिशोर खोत, राहुल पारकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी निगा डायबेटिक फूट क्लिनिक, दीर्घायु हेल्थ केअर सेंटर जामसंडे यांचे सहकार्य लाभले. सरपंच मकरंद शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.