आरवली-टांक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले उत्पादन निर्मिती, विक्री आणि व्यवहारज्ञान कौशल्य…

व्यावसायिक शिक्षण स्टॉलला पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

वेंगुर्ले : दाजी नाईक

श्री सरस्वती विद्यालय, आरवली-टांक येथे व्यावसायिक शिक्षणांतर्गत दिवाळी सणाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विक्री स्टॉलला पालक, शिक्षक, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेले नैसर्गिक उटणे, मोती साबण आणि आकर्षक रंगीत पणत्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या या उत्पादनांना नागरिकांनी पसंती दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पकतेला आणि व्यावसायिक कौशल्यांना प्रोत्साहन मिळाले. तसेच विद्यार्थ्यांना उत्पादननिर्मिती, विक्री आणि व्यवहारज्ञान यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

विद्यालयात विद्यार्थ्यांच्या हातांना कौशल्य, कल्पकतेला संधी आणि स्वावलंबनाला दिशा देणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा नाईक यांनी पुढाकार घेऊन शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीमती निकिता वालावलकर मॅडम व श्रीमती जुलेखाबी खान मॅडम यांनी नियोजन आणि मार्गदर्शन केले. तसेच श्री. सी. एम. हरगुडे सर, श्रीमती डी. आर. झोरे मॅडम, श्री. जे. एस. राऊळ सर, श्रीमती आर. आर. नायगांवकर मॅडम आणि श्री. टी. व्ही. गवस्कर सर यांनी मोलाचे सहकार्य केले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व व्यावसायिक कौशल्यांना वाव देणारा हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.श्रद्धा नाईक व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांचे व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. शंकरभाई कांबळी, सचिव श्री. पी. एस. कौलापुरे सर, सहसचिव श्री. डी. आर. नागवेकर सर आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

या स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करणाऱ्या, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या तसेच प्रत्यक्ष खरेदी करून उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व पालक, शिक्षक, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक आणि येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.