द सोलार मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉ. सचिन शिगवण याचा उपक्रम
चिपळूण : तालुक्यातील नायशी गावामध्ये २५ सौर ऊजेंद्वारे शाश्वत मोफत विद्युतीकरण करण्यात आले असून प्रकल्प निर्मिती फाऊंडेशन आणि ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम मोफत राबविण्यात आला, संपूर्ण भारतात द सोलार मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉ. सचिन यशवंत शिगवण यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला. गावातील ग्रामस्थांनी या उपक्रमाबदल डॉ. शिगवण याचे आभार व्यक्त केले.
नायशी गावचे उपसरपंच संदिप घाग यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. उपक्रमाचे उद्घाटन कंपनीचे प्रतिनिधी श्री. मोहित यांच्या हस्ते डॉ. सचिन शिगवण यांच्या उपस्थित करण्यात आले. यामुळे आता गाव सौर दिपानी उजळून गेले आहे. रात्रीचा हा प्रकाश निश्चित फायदेशीर ठरणार आहे. डॉ सचिन शिगवण यांनी ग्रामीण भागासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी सरपंच रुतीका जाधव, उपसरपंच संदीप घाग, माजी सरपंच किशोर, संदीप राक्षे, पोलीस पाटील प्रशांत पवार, रवींद्र गुरव, सूरज घाग, संतोष कदम, सुमित कदम, महेश धामणस्कर, श्रीराम धामणस्कर, पप्प्या धामणस्कर, जीवक जाधव, धर्मेंद्र लाड, विनोद जाधव, राकेश कोतवडेकर, मनीष जाधव, सुदेश घाग आदी उपस्थित होते. गावातील सुतारवाडी, खोपवाडी, घागवाडी, बाजीवाडी , पाचवेवाडी, गोसाविवाडी, राक्षेवाडी, टेपवाडी नारळेवाडी, बौद्धवाडी फौजदार वाडी, गुरववाडी, नायशी शाळा या ठिकाणी हे २५ सोलर लाईट बसवण्यात आले. सोलार लाईट बसवण्यासाठी गावातील तरुण व ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह प्रा.ली ९ कर्मचारी यांनी परिश्रम घेत गावासाठी मोफत काम केले. सीएसआर फंडातून खर्चातून हा प्रकल्प उभारून गावच्या विकासाला हातभार लावला आहे.












