रत्नागिरी:
शहरानजिकच्या पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील पोदार प्रेप विभागातील इयत्ता सिनियर किंडरगार्टन मध्ये शिकणारी,व शहरातील प्रतिष्टीत कुटुंब मुझम्मिल इक्बाल टेमकर व फरहीन मुझम्मिल टेमकर यांची कन्या कु.फलक मुझम्मिल टेमकर, हिने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी, पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी येथे ‘३ मिनिटांत सर्वाधिक हुला-हूप स्पिन’ या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न केला. शहरातील आरोग्यमंदिर, रत्नागिरी येथे राहणारी फलक गेल्या तीन महिन्यांपासून या महत्त्वपूर्ण प्रयत्नासाठी अत्यंत समर्पणाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सराव करत होती.
सिनियर केजीची विद्यार्थीनी असलेल्या फलकने या प्रयत्नासाठी दाखवलेल्या संतुलन, एकाग्रता आणि मेहनतीने सर्वांना प्रभावित केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमांनुसार अधिकृत साक्षीदार आणि टाइमकीपर्स यांच्या उपस्थितीत हा प्रयत्न पार पडला. फलकच्या चिकाटी व आवडीबद्दल तिच्या पालकांनी आणि शाळा व्यवस्थापनाने अभिमान व्यक्त केला. आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून अधिकृत निकालाची सर्वाना उत्सुकतेने प्रतीक्षा आहे.
तिच्या या कामगिरी साठी शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद तसेच तिचे कुटुंब यासारख्या सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.











