चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने ७८ वा राष्ट्रीय छात्र सेना स्थापनादिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय छात्रांनी ध्वजावंदन देऊन ध्वजास सलामी दिली.
यावेळी प्राचार्य डॉ.माधव बापट, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, मेजर नम्रता माने, लेफ्टनंट मदूसुधन माने तसेच १९ महाराष्ट्र बटालियन व ६ महाराष्ट्र बटालियन, युनायटेड इंग्लिश हायस्कूलचे १३० छात्र हजर होते. यावेळी एनसीसी छात्रांना रॅक प्रमोशन करण्यात आले. यावेळी पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्वच्छता अभियान राबविष्यात आले. नंतर महामार्गावर रस्ते सुरक्षा या अंतर्गत वाहनचालकांमध्ये सीटबेल्ट, हॅल्मेट, वेग मर्यादा, वाहतुकीचे नियम याबद्दल जनजागृती करण्यात आली. प्राचार्य डॉ माधव बापट यांनी एनसीसी छात्रांना कर्तव्याची शपथ दिली. तसेच प्रधानमंत्री यांचा संदेश वाचन करण्यात आले.












