मांगवलीत तरुणावर बिबट्याचा हल्ला
गंभीर घटनेची पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली दखल
पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याचे वनविभागाला दिले आदेश
वैभववाडी l प्रतिनिधी : मांगवली आयरेवाडी येथील विजय अशोक आयरे या विवाहित तरुणावर बिबट्याने हल्ला केला. या घटनेची पालकमंत्री नितेश राणे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. जिल्ह्याचे उपवनसंरक्षक यांना संपर्क साधत पिंजरा लावून त्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा असे आदेश नाम. नितेश राणे यांनी दिले आहेत.
विजय आयरे याच्यावरील ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान मांगवली आयरेवाडी येथील पुलानजीक घडली. या हल्यात विजय गंभीर जखमी जखमी झाला आहे. त्याच्यावर उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सिंधुदुर्ग भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधत घडलेली घटना सांगितली. तसेच वारंवार पाळीव जनावरांवर हल्ले होत असल्याचे त्यांनी नितेश राणे यांना सांगितले. त्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी डीएफओ यांच्याशी संपर्क साधला. हल्ला करणाऱ्या त्या बिबट्याचा पिंजरा लावून तात्काळ बंदोबस्त करा असे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी वन विभागाला दिले आहेत.
बिबटयाची दहशत वैभववाडीत वाढल्याने नागरिक भयभित झाले आहेत.












