राजापूर (वार्ताहर): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळ येथे आयोजित करण्यातप आलेल्या विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत जैतापूर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय जैतापूरच्या वेदांत राजेश करगुटकर चौथा क्रमांक मिळवून राज्य स्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला.
कुडाळ येथील या स्पर्धेत जैतापूर हायस्कुलच्या कुमार वेदांत राजेश करगुटकर व कुमार आर्यन राजप्रसाद राऊत या कॅरम पटून सहभाग नोंदविला.या स्पर्धेत कुमार वेदांतने चौथा क्रमांक मिळवून राज्य स्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला.
जैतापूरचे लोकनियुक्त सरपंच राजप्रसाद राऊत व आदित्य करगुटकर मार्गदर्शक हे या स्पर्धेकांसमवेत कुडाळ येथे गेले होते.शाळेतील उदयोन्मुख कॅरम पटूंना सरावासाठी श्री देव वेताळ मंदिर विश्वस्त मंडळ जैतापूर व सुधाकर राजाराम पाटणकर कुवेशी यांनी प्रत्येकी एक कॅरम सेट भेट दिला आहे.
यशस्वी खेळाडूंचे जैतापूर एज्युकेशन सोसायटी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नारे , ग्रामपंचायत जैतापूर व श्री देव वेताळ मंदिर विश्वस्त मंडळाचे वतीने अभिनंदन करण्यात आले.🌹 राज्य स्तरीय स्पर्धा डेरवण चिपळूण येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.













