राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पद्भार लांजा मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्याकडे

राजापूर प्रतिनिधी: येथील नगर परिषदेच्या रिक्त झालेल्या मुख्याधिकारीपदाचा प्रभारी पद्भार लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्याकडे देण्यात आला आहे. कुंभार यांनी नुकताच हा पद्भार स्विकारला आहे.
राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची बदली झाल्यानंतर मुख्याधिकारी पद  रिक्त झाले होते. नगर परिषद निवडणूक काळात या रिक्त मुख्याधिकारी पदाचा तात्पुरता पद्भार कोल्हापूर महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र निवडणूक संपल्यानंतर त्यांना पुन्हा ते कोल्हापूर महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त या मुळ पदावर रूजू झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त झाले होते. आता राजापूर नगर परिषदेच्या रिक्त मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पद्भार लांजा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्याकडे देण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.