देवगड-जामसंडेतील दिव्यांगांसाठी उदरनिर्वाह निधी; अर्ज करण्याचे आवाहन

देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना सन 2025-26 या आर्थिक वर्षात दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत उदरनिर्वाहासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 5 टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी देवगड-जामसंडे शहरातील पात्र दिव्यांग नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यालयात सादर करावेत. अर्ज कार्यालयीन वेळेत स्वीकारले जाणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत शुक्रवार, दिनांक 30 जानेवारी 2026 अशी आहे.

ही योजना दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यास मदत करणारी असून जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.