दोडामार्ग | सुहास देसाई : भारत गिअर्स लि. ठाणे या कंपनीकडून दोडामार्ग इंग्लिश स्कूलला रू 1. 40 लाखाचा 75 इंची इंटरॅक्टिव्ह डिजिटल स्क्रीन कंपनीच्या शैक्षणिक फंडातून भेट स्वरूपात देण्यात आला. या डिजिटल वर्गाचे संस्थाध्यक्ष श्री. विकासभाई सावंत यांनी यांनी फीत कापून उद्घाटननुकतेच करण्यात आले. यावेळी संस्था सचिव श्री. व्ही. बी. नाईक सर, खजिनदार श्री. सी. एल. नाईक साहेब, इतर सर्व पदाधिकारी, माजी मुख्याध्यापक, तसेच शाळेचे मुख्याध्यापक शैलेश नाईक सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी भारत गिअर्स कंपनीचे श्री. शिवाजी पाटील, प्लांट मॅनेजर, ठाणे यांच्या विशेष प्रयत्नाने दोडामार्ग तालुक्यात अशी सुविधा सर्वात प्रथम झाली, त्याबद्दल संस्थेने त्यांचे व भारत गिअर्स कंपनीचे आभार मानले.
Home सिंधुदुर्ग दोडामार्ग भारत गिअर्स लि. ठाणे कंपनीकडून दोडामार्ग इंग्लिश स्कूलला इंटरॅक्टिव्ह डिजिटल स्क्रीन भेट












