राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेचे पुरस्कार जाहीर

लांजा (प्रतिनिधी): राजापूर लांजा तालुका नागरीक संघ मुंबई या संस्थेच्या वतीने दिले जाणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले असून संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेच्या वतीने तालुक्यातील रिंगणे गावी दिनांक ३० जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या निमित्ताने या दोन तालुक्यातील साहित्य, कला, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, ग्रामीण महिला विकास या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध कर्तृत्ववान व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. संघाच्या परंपरेप्रमाणे संमेलनाच्या अगोदर या पुरस्काराची घोषणा केली जाते. यंदाही ही परंपरा जपत संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी लांजा येथील पत्रकार परिषदेत या विविध पुरस्कारांची घोषणा केली आहे.
साने गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार श्रद्धा दळवी, तिवरे व‌ विशाल मोरे, रत्नागिरी यांना जाहीर झाला आहे. प्रा.मधु दण्डवते आदर्श शिक्षक पुरस्कार. अनिल कदम, कोंडगे व‌ अमोल टाकळे, चिपळूण यांना.‌नाटककार ला कृ आयरे कलाश्री पुरस्कार
मधुकरबुवा तावडे – झर्ये व सुनील बुवा जाधव – प्रभानवल्ली लांजा यांना देण्यात येणार आहे.उद्यम पुरस्कार संदेश र. पेडणेकर, रिंगणे व‌ स्वरुप गुरव ,लांजा यांना देण्यात येणार आहे.माऊली पुरस्कार –
दिगंबर हांदे , रिंगणे व‌ नारायण गोसावी -मळगाव सावंतवाडी याना दिला जाणार आहे.
बळीराजा पुरस्कार चंद्रहास दादा नारकर , पाचल व प्रभाकर चव्हाण, कोंडगे -लांजा यांना, नारायण तावडे जनमित्र पुरस्कार.- संतोष पांचाळ ,सर्कल अधिकारी,लांजा व संतोष चव्हाण, ग्राम अधिकारी, राजापूर यांना दिला जाणार आहे. बॅ. नाथ पै सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार -अभिजीत हेगशेट्ये, रत्नागिरी व‌ सुहास चव्हाण ,वाटूळ यांना दिला जाणार आहे.
आदर्श गृहिणीचा पुरस्कार- प्रमिला या.सुतार, राजापूर, सौ.वसुंधरा पेडणेकर, लांजा यांना, साध्वी सावित्रीबाई फुले सामाजिक महिला कार्यकर्ता पुरस्कार – मीना दर्णे – रायगड यांना तर
साक्षी जैतापकर – मीठगवाणे यांना देण्यात येणार आहे. पत्रकार गजाभाऊ वाघदरे अक्षर मित्र पुरस्कार विजयराज बोधनकर – वर्धा व‌अजय कांडर – कणकवली यांना, क्रीडा रत्न पुरस्कार -मानसी संजय हांदे – रिंगणे व रेयांश खामकर-आरगाव दिला जाणार आहे.
संस्था कार्यकर्ता पुरस्कार –
अनंत चाळके, कुरंग यांना, जनार्दन बाळकृष्ण पाटोळे जीवन गौरव पुरस्कार शामराव पानवलकर-लांजा यांना,श्रीमती रजनी गोपाळ पांचाळ जीवन गौरव पुरस्कार सीताराम सांडम गुरुजी – रिंगणे यांना तसेच कोकण भूषण पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांना दिला जाणार आहे.