राजापुरात आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा

राजापूर प्रतिनिधी : राजापूर, लांजा-साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस बुधवारी ७ जानेवारी रोजी राजापुरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. राजापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या अभिष्टचिंतन सोहळयाला राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांसह अनेक मान्यवरांनी आ. सामंत यांना शुभेच्छा दिल्या.
आ. किरण सामंत यांचा बुधवारचच ७ जानेवारी रोजीचा वाढदिवस राजापूर, लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. तर रत्नागिरीतही आ. सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजापुरात रक्तदान शिबीरासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. राजापूर तालुका शिवसेना, युवा सेना, ठेकेदार संघटना व सामंत मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
राजापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या अभिष्टचिंतन सोहळयाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत आ. सामंत यांना शुभेच्छा दिल्या. राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे, एड. जमिर खलिफे यांसह सर्व नगरसेवकांनी आ. सामंत यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तर राजापूर पत्रकार संघाच्या वतीने सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधवांनी आ. सामंत यांना शुभेच्छा दिल्या. कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी देखील राजापूरात आ. सामंत यांना शुभेच्छा दिल्या. तर शिवसेना युवा नेत्या अपुर्वा सामंत यांनीही युवा पदाधिकाऱ्यांसह आ. सामंत यांना शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश कुवळेकर, विधानसभा प्रमुख राजू कुरूप, तालुका अध्यक्ष दीपक नागले, शहर प्रमुख सौरभ खडपे यांसह सर्व नगरसेवक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकिय अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी आ. सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.