डोअर-टू-डोअर प्रचाराला मतदारांचा वाढता प्रतिसाद
प. स. शिरगांव मतदार संघात महायुती भाजपच्या शीतल तावडे बिनविरोध
शिरगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद शिरगाव मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे.
या जिल्हा परिषद मतदारसंघात शिरगाव व तळवडे हे पंचायत समिती मतदारसंघ समाविष्ट आहेत.
जिल्हा परिषद शिरगाव मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार देवदत्त दामोदर कदम निवडणूक रिंगणात आहेत या मतदारसंघात पंचरंगी लढत होणार असल्याने निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
पंचायत समिती शिरगाव मतदारसंघातून महायुती भाजपच्या शीतल तावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तर पंचायत समिती तळवडे मतदारसंघातून महायुतीच्या सलोनी संतोष तळवडेकर व मयुरी चादोसकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.
सध्या महायुतीकडून शिरगाव मतदारसंघातील डोअर-टू-डोअर प्रचार करण्यात येत असून या प्रचार मोहिमेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी भाजप–महायुती सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे तसेच भविष्यातील विकासाचे संकल्प यांची माहिती प्रचारादरम्यान मतदारांना देण्यात येत आहे.
या प्रचार मोहिमेत महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.












