ऐन निवडणूकीत आमदार किरण सामंत यांचा उबाठा दणका

धोपेश्वर सरपंच उमेश शिवगण यांसह शेकडो जणांचा शिवसेनेत प्रवेश

राजापूर प्रतिनिधी आमदार किरण सामंत यांनी पुन्हा एकदा ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत उबाठा ला दणका दिला आहे. धोपेश्वरचे तरूण सरपंच उमेश शिवगण यांच्यासह धोपेश्वर गावातील शेकडो जणांनी आ. सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला आहे.
या सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करत आ. किरण सामंत यांनी कामाला लागा धोपेश्वर गावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी या प्रवेशकर्त्यांना दिली.
धोपेश्वर सरपंच उमेश शिवगण यांच्या शिवसेना प्रवेशामुळे धोपेश्वर पंचायत समिती गणातील शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार योगेश नकाशे यांचे पारडे जड झाले आहे.
आ. किरण सामंत यांनी काही दिवसापुर्वीच काँग्रेस व उबाठाला धक्का दिला होता. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतानाच आ. सामंत यांनी पुन्हा एकदा उबाठाला दणका दिला आहे. धोपेश्वर पंचायत समिती गणातील शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार योगेश नकाशे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. आ. किरण सामंत या निवडणूकीच्या प्रचारात जातीनिशी लक्ष घालुन उतरले आहेत. त्यामुळे पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.
आ. किरण सामंत यांची कार्यपध्दती व विकासाभिमुख राजकारण यावर विश्वास ठेवत अनेकजण शिवसेनेत जाहिर प्रवेश करत आहेत. धोपेश्वर सरपंच व ग्रामस्थांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील विकासात्मक राजकारण करत गावच्या विकासासाठी आ. सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यामध्ये सरपंच उमेश शिवगण यांसह अनंत सोगम, आत्माराम शिवगण, ओंकार सोंगम, हरश्चंद्र सोगम आदींसह अन्य ग्रामस्थांचा समावेश आहे.
याप्रसंगी आ. किरण सामंत यांसह शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले, महिला आघाडीच्या दुर्वा तावडे, धोपेश्वर जि. प. गटाचे उमेदवार प्रकाश कुवळेकर, पं. स. गणाचे उमेदवार योगेश नकाशे तसेच महेश नकाशे, सुभाष गुरव, पुरोषत्तम खांबल आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.