शिवस्मृती मंडळ राजापूरच्या नूतन अध्यक्षपदी नगरसेवक सुबोध पवार यांची निवड

राजापूर (वार्ताहर): येथील शिवस्मृती मंडळ राजापूरच्या नूतन अध्यक्षपदी नगरसेवक सुबोध पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शिवस्मृती मंडळा तर्फे प्रतिवर्षा प्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या नियोजनाची बैठक ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिरात नुकतीच पार पडली. या बैठकीत ही निवड करण्यात आली.
यावेळी मंडळाच्या उपाध्यक्षपदी हर्षदा खानविलकर, विवेक गुरव, डॉ.शुभम कुशे, खजिनदारपदी अविनाश पाटणकर, सचिवपदी अभिजीत नार्वेकर यांची तर उत्सव पमुख म्हणून दिलीप चव्हाण, दिलीप अमरे, महेश मयेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

त्यानंतर श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षीच्या शिवजयंती उत्सवाच्या नियोजनाची रूपरेषा ठरवण्यात आली. गेली अनेक वर्षे शिवस्मृती मंडळातर्फे शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. १९८३ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाचे हे ४४ वे वर्ष आहे. छत्रपती शिवराय हे सर्वांचेच आराध्य आणि स्फूर्तिस्थान असल्यामुळे यावर्षी पासून सर्वच राजकिय, सामाजिक धार्मिक संघटना, स्थानिक मंडळे, संस्था आणि प्रतिष्ठाने यांना सोबत घेऊन, यासर्वांचे योगदान आणि सहकार्य घेऊन शिवस्मृती मंडळाच्या अधिपत्याखाली शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे शिवजयंती उत्सवाच्या पुढील नियोजनाची बैठक शुकवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सायं. ठिक ७.३० वा. ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर याठिकाणी घेण्याचे निश्चीत करण्यात आले. या बैठकीला संदिप मालपेकर, मंदार बावधनकर, गोविंद चव्हाण, विनायक सावंत, रूपेश शेलार, राजेंद्र नवाळे, विनोद गादीकर, देवेंद्र शेट्ये, विवेक गुरव, तेजस गुरव, संदेश आंबेकर, अक्षय पोकळे, पथम नारकर, निखील चव्हाण, प्रकाश नाचणेकर, प्रसाद नवरे यांयासह शिवस्मृती मंडळाचे आजी माजी पदाधिकारी, विविध हिंदुत्ववादी संघटना आणि शिवभक्त मोठ्या संखेने उपस्थित होते.