माजी विद्यार्थी महामेळावा मंच यांच्यावतीने आयोजन
चौके – प्रतिनिधी :- मालवण तालुक्यातील भ ता चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके विद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा तयारीच्या दृष्टीने माजी विद्यार्थी महामेळावा मंच यांच्यावतीने शतक योजना कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. या दृष्टीने पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी व पालक व विद्यार्थी यांचा मेळावा प्रशालेच्या सभागृहामध्ये संपन्न झाला.
बालपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात असलेली गणित व इंग्रजी विषयाचे अनामिक भीती दूर करण्यासाठी माजी विद्यार्थी संघ स्थानिक समिती तसेच चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने तज्ञ मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली असून दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने प्रशालेमध्ये कौतुकास्पद पाऊल उचलण्यातआले आहे .
गणित विषयातील ब्रेन म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक संजय मोरे हे विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने गणित विषयाचे मार्गदर्शन करणार आहेत. गणित विषयातील अनेक क्लुप्त्या विद्यार्थ्यांना आत्मसात करून त्यांच्या मनात असलेली भीती दूर करतानाच गणिताशी मैत्री करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सदर उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एम एस परीक्षा एन टी एस होमी भाभा परीक्षा यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तयार करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम या माध्यमातून केले जाणार आहे. मुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाबरोबर शैक्षणिक प्रगतीमध्ये सुद्धा कमालीची भर पडण्यास मदत होणार आहे.
याचबरोबर इंग्रजी विषयाच्या अध्यापनासाठी श्री शेवडे सर्व बेलसरे सर हे शिक्षक काम पाहत आहेत. विद्यार्थ्यांना व्याकरणासोबतच सहज सोपे इंग्रजी बोलता यावे दैनंदिन जीवनात त्याचा वापर करता यावा या दृष्टीने प्रशालेचा प्रयत्न सुरू आहे.
शाळेतील भविष्यातील शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागविण्याच्या दृष्टीने संस्थेने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
आजच्या पालक मेळाव्याला चौके पंचक्रोशीच्या गावांमधून 70 पालक तसेच 90 विद्यार्थी समाविष्ट झाले होते.
या सर्वांना या उपक्रमाची व्याप्ती समजावून देण्यात आली तसेच श्री संजय मोरे सर यांनी विद्यार्थ्यांना कठीणात कठीण गणिते सहज सोडविण्याच्या क्लुप्त्या सादर करून विद्यार्थी वर्गामध्ये चैतन्य निर्माण केले.
सदर कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्री संतोष धुरी, सानिक समितीचे अध्यक्ष श्री बिजेंद्र गावडे,श्री शंकर गावडे सर,श्री शामसुंदर मेस्त्री,पत्रकार नितीन गावडे,निवृत्त शिक्षक विजय चौकेकर, सुरेश चौकेकर सर पंचक्रतीतील प्राथमिक शाळांचे शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.












