उभादांडा न्यू इंग्लिश स्कूल ज्ञान आणि संस्काराचे केंद्र : प्रा. वैभव खानोलकर 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

न्यू इंग्लिश स्कूल चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला अभ्यासक, युवा व्याख्याते उपक्रमशील शिक्षक आणि सुप्रसिद्ध निवेदक म्हणून लौकिक असलेल्या प्रा वैभव खानोलकर हे उपस्थित होते

यावेळी मार्गदर्शन पर मनोगतात न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हि केवळ शाळा नाही तर एक संस्कृर आणि ज्ञान देणारे उत्तम नागरिक घडवण्याचे केंद्र असल्याचे गौरवोद्गार प्रा वैभव खानोलकर यांनी काढले.

गेली पाच वर्षे वैभव खानोलकर यांनी याच शाळेमध्ये अध्यापक म्हणून कार्य केले आणि याच शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणुन सन्मान दिला गेला यावर ऋण व्यक्त करताना ते म्हणाले कि या शाळेमध्ये अध्यापक म्हणून काम करताना संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी ठेवलेला विश्वास आणि केलेले सहकार्य यामुळे अनेक विविध स्पर्धांमध्ये यश मिळवता आले ,

यशात मागे असणारे पण कधीच न दिसणारे हात खुप महत्वाचे असतात असं सागणाऱ्या वैभव खानोलकर यांनी यशाला गवसणी घालायची असेल तर प्रयत्न, सातत्य, संयम आणि जिद्द महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

आपल्या प्रभावी वक्तृत्वाने या आणि ओघवत्या भाषाशैलीतुन त्यांनी केलेलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांन सह इतर मान्यवरांना भावले.

या वर्षीचा आदर्श विद्यार्थी हा सन्मान कु.सोहम सुहास टेमकर तर

आदर्श विदयार्थीनी प्रणाली अनंत गवंडे हिला देऊन गौरविण्यात आले क्रीडा वीर सन्मान दीपराज हरेश तांडेल आणि क्रीडा बाले साठी प्राप्ती प्रदीप डिचोलकर याची निवड करण्यात आली तर माजी विद्यार्थी संघाच्या वतीने

कला सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी साठी दिला जाणारा सन्मान यावर्षी अमृता दत्ताराम नवार हिला देतं गौरविण्यात आले

आदर्श शिक्षक म्हणून श्री प्रथमेश सुरेश ठाकूर यांचा हि सन्मान या बक्षिस वितरण करण्यात आला.

अध्यक्षीय मनोगतात विरेंद्र आडारकर यांनी प्रमुख पाहुणे असलेल्या प्रा.वैभव खानोलकर यांचे विशेष कौतुक केले एक अध्यापक म्हणून त्याची धडपड निश्चित आदर्शवादी असल्याचे ते म्हणाले जेव्हा ते नेमळे पंचक्रोशी विद्यालयात होते तेव्हा तिथे ही अनेक मुलाना त्यानी विविध स्पर्धांमध्ये भरघोस यश मिळवून दिले आमच्या प्रशालेत आले आणि इथे सुद्धा अनेक स्पर्धामध्ये यश मिळवले,असे शिक्षक खुप कमी असतात जे केवळ मुलं शाळेत साठी स्वतःला वाहून घेतात असे ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर सचिव श्री रमेश नरसुले मुख्याध्यापिक

सौ अश्वमी भिसे माजी मुख्याध्यापक

श्री उमेश वाळवेकर

तसेच संस्था पदाधिकारी श्री राधाकृष्ण मांजरेकर

श्री गोविंद मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला पालक आणि माजी विद्यार्थी शिक्षक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुत्रसंचालन दीपक बोडेकर यांनी केले.