सावंतवाडी । प्रतिनिधी :
जिल्ह्यातील नामांकित संगणक प्रशिक्षण संस्था ‘एस.एस.आय. कॉम्प्युटर’च्या वतीने येत्या रविवार ८ मार्च रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सन २०२४-२५ च्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण आणि सन २०२५-२६ च्या नवीन तुकड्यांच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावेळी विशेष महिला सन्मान सोहळाही पार पडणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. नकुल पार्सेकर, मोहन होडावडेकर, उमेश गाळवणकर, भैय्याजी येरमे, दिलीप भारमल, श्रीमती इनुजा शेख, भूपतसेन सावंत आणि प्रा. कैलास राबते यांची उपस्थिती लाभणार आहे.
हा कार्यक्रम ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री. रघुनाथ तानावडे आणि डॉ. सौ. गौरी तानावडे यांनी केले आहे.












