गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे तर्फे देवळे गोताड वाडी येथे भाजपा च्या संगमेश्वर तालुका महिला मोर्चा दक्षिण उपाध्यक्षा सौ रुपाली कदम यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी संगमेश्वर भाजपा तालुका अध्यक्ष रुपेश कदम उपस्थित होते.
दरवर्षी करंबेळे तर्फे देवळे येथे शिमगोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो.गोताडवाडी येथे छोटे खानी कार्यक्रम झाला.यामध्ये सौ रुपाली कदम ,रुपेश कदम व अन्य मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवसेना उबाठा गटाचे प्रदीप ढवळ,गाव विकास समिती चे संघटन प्रमुख सुहास खंडागळे,अध्यक्ष उदय गोताड,गावकर राजेश गोताड,दत्ताराम धावडे,सचिन बंडागळे उपस्थित होते.धनीन देवी सेवा मंडळ यांच्या वतीने हा सत्कार सोहळा झाला.












