लांजा | प्रतिनिधी : लांजा तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने मंगळवारी १ ऑगस्ट रोजी लांजा हायस्कूलच्या पटांगणावर तालुकास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
लांजा तालुका कबड्डी असोसिएशनचे सचिव आणि लांजा तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व आणि लांजा हायस्कूलचे क्रीडाशिक्षक रवींद्र वासुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ४.०० वाजता कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना आणि बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लांजा तालुका कबड्डी असोसिएशन, सर्व संघ व्यवस्थापक, संघ प्रतिनिधी ,खेळाडू ,पंच, क्रीडाप्रेमी मेहनत घेत आहेत










