लांजा (प्रतिनिधी) :लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने मुंबई स्थित मराठा समाज बांधवांचा मेळावा रविवार दिनांक २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता पराग विद्यालय, भांडुप या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
लांजा तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी एकत्र येत १९८३ साली लांजा तालुका मराठा संघाची स्थापना केली होती. त्यानंतर या संघाच्या वतीने दरवर्षी शिवजयंती उत्सव ,विद्यार्थी गुणगौरव यासारखे विविध उपक्रम राबवले जातात.
लांजा तालुक्यातील अनेक मराठा समाज बांधव हे मुंबई येथे नोकरी, व्यवसाय निमित्त स्थायिक झालेले आहेत. गावी आल्यानंतर त्यांच्या मनात रुखरुख लागते की, आपल्या समाजाचा हक्काचा असं केंद्र या ठिकाणी उभे राहावं. ज्यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मराठा विद्यार्थी वस्तीगृह, मराठा उद्योग केंद्र, शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा असे बहुउद्देशीय लांजा तालुका मराठा भवन या ठिकाणी उभे राहावं, मराठा भावनांची वास्तू उभी राहावी.
म्हणूनच मराठा भवन च्या निर्मितीचे निश्चित धोरण ठरवण्यासाठी, मुंबईस्थित मराठी व्यावसायिक, उद्योजक आणि समाजबांधवांशी चर्चा करण्यासाठी, पुढील दिशा ठरवण्यासाठी लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने २२ मार्च रोजी हा मुंबईतील मराठा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी या मेळाव्याला मुंबईस्थित मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, सरचिटणीस विजय पाटोळे आणि सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
Home महत्वाच्या बातम्या मुंबईस्थित मराठा समाज बांधवांचा २२ मार्च रोजी मुंबईत मेळावा लांजा तालुका मराठा...













