सरंद येथे स्व.अजित पवार यांना श्रद्धांजली

गौरव पोंक्षे माखजन:
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संगमेश्वर तालुक्यातील सरंद गोटेकर वाडी येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नवतरुण विकास मंडळ व महिला मंडळ गोटेकर वाडी सरंद येथे मंडळाचा २६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी श्री सत्यनारायण पूजा देखील झाली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमावेळी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्याविषयी आढावा घेत,त्यांच्या अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आली व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील गोटेकर,उपाध्यक्ष मंगेश गोटेकर, मुंबई अध्यक्ष सुधीर गोटेकर,महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा गोटेकर,उपाध्यक्षा सारिका गोटेकर, संतोष गोटेकर,आदिंसह वाडीतील पदाधिकारी,रहिवासी उपस्थित होते.