चिपळूण (वार्ताहर) : महिला बालकल्याण विभाग, महिला बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प एक व दोन आणि संरक्षण अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमानाने मंगळवार २४ रोजी सकाळी ११ वाजता प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृह प्रांत कार्यालय जवळ महिला मेळावा आणि आदर्श अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका सेविका, मदतनीस यांच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय सेवा बजावत असताना ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांचा या कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले , उपसभापती संदेश आयरे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रीती शिवगण, सुनीता नायकुडे व माधवी जाधव यांनी केले आहे.










