लक्ष्मी प्रभू-खानोलकर ने पटकाविला ‘वेंगुर्ले क्वीन’ चा मुकुट…

जबरदस्त सांस्कृतिक मंडळाच्या गरुडझेप महोत्सवात स्पर्धा ठरली रंगतदार…

वेंगुर्ले : दाजी नाईक 

वेंगुर्ले शहरातील राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वेंगुर्ले क्वीन’ या सौंदर्य स्पर्धेत वेंगुर्ले शहरातील लक्ष्मी प्रभू-खानोलकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. उत्तरोतर रंगत गेलेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातील १३ सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून स्पर्धेचा आनंद लुटला.

वेंगुर्ले शहरातील नायरा पेट्रोल पंप समोर खुल्या मैदानात झालेल्या या स्पर्धेमध्ये मळेवाड सावंतवाडी येथील स्नेहा शिरसाट, कुडाळ येथील शितल टिक्कस, वेंगुर्ले येथील लक्ष्मी प्रमू खानोलकर, कणकवली येथील समृद्धी पवार, सावंतवाडी येवील तन्वी गोसावी, अणसूर-वेंगुर्ले येथील काजल गावडे, सावंतवाडीची नंदिनी बिले, लातूर येथील मनिषा गमवडे, कुणकेरी सावंतवाडी येथील रसिका धुरी, तळवडे सावंतवाडी येथील कष्मिरा ठाकुर, उभादांडा वेंगुर्ले येथील दिव्या बागायतकर, कुडाळची तेजस्विनी शिरोडकर आणि वेंगुर्त्याची किरण मेस्त्री या तेरा स्पर्थकांनी या स्पर्धेची रंगत वाढविली. स्पर्धेचे परीक्षण प्रवीण पराडकर, पूनम बोवलेकर आणि महेंद्र मातोंडकर यांनी केले.

वेगुर्त्याची कन्या लक्ष्मी प्रभूखानोलकर हिने तिन्ही फेऱ्यांमध्ये आघाडी घेत ‘वेंगुर्ले क्वीन’ या स्पर्येच्या किताबावर आपले नाव कोरले. कुणकेरी सावंतवाडी येथील रसिका धुरी हिने उपविजेतेपद पटकाविले तर तृतीय क्रमांकाची मानकरी होण्याचा मान सावंतवाडी येथील नंदिनी बिले हिने मिळविला.

बेस्ट स्माईल हे पारितोषिक अणसूर गावची कन्या काजल गावडे हिने तर बेस्ट हेअरस्टाईलचे पारितोषिक कुडाळच्या शितल टिक्कस यांनी मिळविले. स्पर्धेसाठी रॅम्पवॉक कोरिओग्राफर म्हणून प्रवीण पराडकर व पंकज शिरसाट यांनी जबाबदारी संभाळली. वेंगुर्ले पालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, विद्यमान नगरसेविका समिधा रेडकर, संगीता नाईक, जबरदस्त सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व परीक्षकांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन कुडाळातील चिमणी पाखरं डान्स अकादमीचे संचालक तथा डान्स कोरिओग्राफर रवी कुडाळकर यांनी केले. चिमणी पाखरं डान्स अकादमीच्या मुलांनी प्रत्येक फेऱ्यांच्या दरम्यान सादर केलेले अप्रतिम नृत्यांविष्कारही रसिकांना भावले.