कट्टा येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ!

मसुरे | झुंजार पेडणेकर
बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ केंद्रशाळा कट्टा नं. १ शाळेत करण्यात आला.

यावेळी बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे विश्वस्त दीपक भोगटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा ही पुढील सर्व स्पर्धा परीक्षांची पायाभूत परीक्षा आहे. मुलांनी अत्यंत अभ्यासू वृत्तीने या परीक्षेस सामोरे जावे. बॅ. नाथ पै सेवांगण नेहमीच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवत असते. प्राथमिक शिक्षक भारती मालवण शाखेच्या सहकार्याने ४ थी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा उपक्रम दरवर्षी करण्यात येईल असे सांगून मुलांना शुभेच्छा दिल्या.

प्राथमिक शिक्षक भारतीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी गेली अनेक वर्षे सेवांगण राबवत असलेले शैक्षणिक उपक्रम स्तुत्य असून आज प्राथमिक शिक्षक भारती व बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या सहकार्याने आम्ही हा सराव परीक्षेचा उपक्रम यशस्वीपणे संपन्न करतोय याचा विशेष आनंद वाटतो. बॅ. नाथ पै सेवांगणच्या सहकार्याने अनेक शैक्षणिक उपक्रम करण्याचा मानस त्यांनी जाहीर केला व मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

प्राथमिक शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष दिनकर शिरवलकर यांनी या सराव परीक्षेची माहिती दिली. संपूर्ण मालवण तालुक्यातील २१ केंद्रांवरील ४६४ विद्यार्थी सहभागी झाले. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा लवकरच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कट्टा केंद्र शाळेचे मुख्याध्यापक
कुऱ्हाडे सर यानी आभार मानले

यावेळी बापू तळावडेकर, संतोष पाताडे, दीपक भोगटे, कुऱ्हाडे सर, दिनकर शिर वलकर, मारुती चव्हाण, स्मिता पांचाळ, उद्धवराव खेडकर, नेहा काळसेकर, रश्मी धुर्वे, श्रीकृष्ण गोंधळी पालक विद्यार्थी उपस्थित होते.