वेंगुर्ले शाळा नंबर ४ साठी संगणक प्राप्त : सभापती शंकर घारे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

वेंगुर्ले : प्रतिनिधी

शिक्षक परिषद आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून वेंगुर्ले शाळा नंबर ४ साठी मिळालेल्या संगणकाचे उद्घाटन वेंगुर्ले पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ ही यावेळी पार पडला.

कार्यक्रमाला वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित राऊळ तसेच नगरसेवक सुधीर पालेकर, आकांक्षा परब, प्रणव वायंगणकर, सचिन शेट्ये, युवराज जाधव, दाजी परब, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष हर्षद परब, मुख्याध्यापक संतोष परब तसेच सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.