मराठी भाषेला राजकीय मुद्दा करून ठाकरे बंधू एकत्र आले; त्यांना शुभेच्छा 

माजी आमदार संजय कदम यांचा टोला

*दापोली l प्रतिनिधी* उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही आता एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता महायुतीमधील नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशीच एक मोठी प्रतिक्रिया माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम त्यांचे पूर्वाश्रमीचे शिलेदार असलेले व काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केलेले दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम यांनी दिली असून त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.पाठीमागे काही ताकद शिल्लक नाही आणि आता ते मराठीचा मुद्दा घेऊन पुढे ऐत आहेत.मराठीचा मुद्दा हा राजकीय दृष्ट्या पुढे आणला जातोय, पूर्वी एकत्र कोण कोण होतं ते आता आयपीएल झालंय अशा शब्दात संजय कदम यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना सुनावले आहे

 

दोन्ही ठाकरे बंधूंना शुभेच्छा…! शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या रामदास कदम यांच्या शिलेदाराने सुनावले आहे. पाठीमागे काही ताकद शिल्लक नाही आणि आता ते मराठीचा मुद्दा घेऊन पुढे ऐत आहेत. मराठीचा मुद्दा हा राजकीय दृष्ट्या पुढे आणला जातोय संजय कदम पूर्वी एकत्र कोण कोण होतं ते आता आयपीएल झालंय आता आम्ही सर्वजण विचाराने शिवसेनेत सोबत आहोत.

 

दोन भाऊ एकत्र येतात त्यांना शुभेच्छा असे माजी आमदार संजय कदम यांनी सांगितले. गुहागर तालुक्यातील तळवली येथे एका कार्यक्रमात प्रसंगी आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तरे दिली.

 

ते पुढे असेही म्हणाले की या दोन भावांच्या पाठीमागे काही ताकद शिल्लक नाही पाठीमागे काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे होतं पण ते पण आता नाही आणि आता ते मराठीचा मुद्दा घेऊन पुढे ऐत आहेत.

 

मराठीचा मुद्दा हा राजकीय दृष्ट्या पुढे आणला जातोय असे संजय कदम यांनी सांगितले.

 

वैभव खेडेकर यांनी जर पाच तारखेच निमंत्रण दिलं तर तुम्ही त्या कार्यक्रमाला जाणार का असे विचारल्यानंतर ते म्हणाले की पूर्वी एकत्र कोण कोण होतं ते आता आयपीएल झालंय. आता आम्ही सर्वजण विचाराने शिवसेनेत सोबत आहोत .