मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री भावई देवी मंदिर, मालडी येथे जीणोद्धार वर्धापन दिन सोहळा १३ व १४ मे २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. सोहळा बुधवारपासून सुरू होणार असून सकाळी ९ वाजता अभिषेक व आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद यांचा कार्यक्रम पार पडेल. संध्याकाळी ग्रामस्थांच्या सुरेल भजनाने कार्यक्रमाची शोभा वाढविण्यात येईल. रात्री ९ वाजता मामा मोचेमाडकर पारंपारिक दशावतार नाटक मंडळ, मोचेमाड, ता.वेंगुर्ला प्रस्तुत महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग दक्ष जन्म सादरीकरण केले जाईल. १४ मे रोजी रंगमेळा कार्यक्रम (मालवण मेढा येथील) रात्री ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर मालडी जल्लोष २०२६ हा कार्यक्रम पार पडेल, ज्यामध्ये मालडी आणि मुंबई येथील ग्रामस्थ सहभागी होतील. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.












