कोतवडे येथील घटना
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील कोतवडे येथे झाडावर चढून रातांबे काढत असताना खाली पडून गंभिर जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारांदरम्यान अखेर जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 15 मे रोजी सायंकाळी 5.30 वा.सुमारास घडली.
सुरेश आबा मांडवकर (71,रा.कोतवडे,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी 10.30 वा.सुमारास त्यांच्या जमिनीमध्ये असलेल्या रातांब्याच्या झाडावर शिडी लावून रातांबे काढण्यासाठी चढले होते. त्यावेळी त्यांचा तोल जाउन ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मुकामार लागला होता. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे येथे नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना सायंकाळी 5.30 वा.सुमारास त्यांचा उपचारांदरम्यान अतिदक्षता विभागात मृत्यू झाला.













