गुहागरात श्री सदस्यांतर्फे स्वच्छता मोहीम

डॉ धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रस्ते स्वच्छ ठेवण्याचे अभियान

गुहागर (प्रतिनिधी):डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शेकडो श्री सदस्यांनी शहरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी 4 टन ओला कचरा व 1.50 टन सुका कचरा गोळा करण्यात आला. डॉ धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रमध्ये रस्ते दत्तक स्वरूपात घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे अभियान राबविण्यात येत आहे.तसेच शहरातील गुहागर रस्ता तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी देखील स्वच्छता करण्यात आली.यावेळी कचरा नगरपंचायतीच्या कचरा गाडीमध्ये तसेच सदस्यांनी काही खाजगी वाहने उपलब्ध करून त्याद्वारे कचरा नागरपंचायतीने ठरवून दिलेल्या जागेमध्ये टाकण्यात आला.या अभियानात मोठ्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते.