आचरेत विद्यूत मंडळाविरोधात ग्रामस्थ आक्रमक 

वीज कार्यालय बंद करत अधिकाऱ्यांना रस्त्यावर उभे करुन केला रास्तारोको

आचरा-अर्जुन बापर्डेकर :वारंवार खंडित होणाऱ्या वीज समस्येने आदीच हैराण आचरे वासियांना सोमवारी दिवसभर मेंन्टेन्सच्या नावाखाली वीज पुरवठा खंडीत ठेवला. मात्र संध्याकाळी सुरू झालेला वीज पुरवठा काही काळाने पुन्हा खंडित झाला तो मंगळवारी सकाळपर्यंत सुरुच झाला नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत कार्यालयावर धडक दिली.सक्षम अधिकारीच उपस्थित नसल्याने कार्यालयही बंद करून समस्यांचे निराकरण करण्यास अपयशी

अधिकाऱ्यांना सोबत घेत बाजारपेठ ते आचरा तीठा वीज मंडळाविरोधात घोषणा देत मोर्चा काढला. संतप्त आंदोलन कर्त्यांनी आचरा तिठा येथे पोहचल्यावर ठिय्या मारत वीज मंडळा विरोधात घोषणाबाजी केली.सकाळी दहा पासून सुरू झालेले आंदोलन दुपारी तीन पर्यंत सहा तासांच्या वर सुरू होते.यावेळी उपस्थित अधिका-यांनी वीज समस्या तातडीने सोडवतो असे सांगितल्यावरच पुन्हा समस्या निर्माण झाल्यास याहिपेक्षा ग्रामस्थांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागण्याचा इशारा देत आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या सह जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, पंस सदस्य गणेश तोंडवळकर,उपसरपंच संतोष मिराशी, राजन गांवकर,जयप्रकाश परुळेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,उपाध्यक्ष मंदार सांबारी ग्रा.स. पंकज आचरेकर, चावल मुजावर,अनुष्का गांवकर,किशोरी आचरेकर,श्रूती सावंत, ग्रामस्थ मंगेश टेमकर, अभय भोसले, पाडूरंग वायंगणकर, राजन पांगे,चंदू सावंत,जगदीश पांगे अजित घाडी, उदय घाडी,चंदन पांगे,मंगेश मेस्त्री, विजय कदम,विकास कावले,विकास साटम,नारायण कुबल शाम घाडी,हर्षद धुरी,शैलेश मुणगेकर,मांगिरीष सांबारी, शंकर मिराशी, नितीन घाडी, विक्रांत आचरेकर,सुरेंद्र कुबल, सचिन गुळगुळेयांसह बहुसंख्य पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

गेला महिनाभर वारंवार खंडित होणा-या वीजपुरवठयामुळे आदीच हैराण झालेले आचरावासियांनी सोमवारी दिवसभर मेन्टेनन्स च्या नावाखाली खंडित ठेवलेला वीज पुरवठाही ऐन उष्णतेच्या कहरीत सहन केला होता.मात्र सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता आचरा परीसरातील काही भागात सुरू झालेला वीजपुरवठा काही काळानंतर पुन्हा वीज खंडित झाला.तो वीजपुरवठा मंगळवारी सकाळपर्यंतही सुरू झाला नव्हता.त्यामुळेसोमवारी रात्र अंधारातच जागून काढलेल्या ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंतच झाला.यामुळे संतप्त आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा बाजारपेठ येथील वीज मंडळ कार्यालयावर धडक दिली.यावेळी आंदोलकांच्या समस्या सोडविण्यासाठी तासभर वाट बघूनही सक्षम अधिकारी उपलब्ध झाले नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून ऑफिसच बंद करून टाकले यानंतर आलेले सहाय्यक अभियंता सौरभ वर्मा, कनिष्ठ अभियंता ओम शिंदे यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्यामागचे कारण काय व्यापा-यांचे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण असे प्रश्न विचारत भंडावून सोडले.जोपर्यंत लोकांच्या प्रश्नांवर सक्षम उत्तर देणारा अधिकारी येत नाही तोपर्यंत येथून हलणार नसल्याचा पवित्रा घेत आचरा बाजारपेठ येथील कार्यालयासमोर रस्त्यावरच ग्रामस्थ उभे ठाकले.यावेळी आलेले आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी कार्यालयाचा दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केले त्यावेळी मालवण खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी आक्रमक होत दरवाजा उघडण्यास विरोध केला.आमच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी घेता का असा प्रश्न विचारत आमच्या वर गुन्हे दाखल केले तरी आम्ही आज मागे हटणार नसल्याचा पवित्रा घेतला.यावेळी प्रभारी चार्ज असलेले

देवगड येथील उपकार्यकारी अभियंता लिमकर हे उपस्थित होताच संतप्त ग्रामस्थांनी घेराव घालत त्यांना उन्हातच उभे करत प्रश्नांचा भडीमार सुरु केला.गेल्या वर्षी आचरा सरपंच आणि ग्रामस्थांना लेखी हमी देवूनही वीज पुरवठा सुरळीत का झाला नाही.त्याच समस्या अजूनही कशा.तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळत आहात.नुसत लिहून देता कारभारात सुधारणा काहीच नाही.अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना भंडावून सोडले.अनुत्तरीत झालेल्या लिमकर यांना तुम्ही आमच्या समस्यांचे निवारण करत नसाल तर सक्षम अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घ्या असे सुनावले.यावेळी लिमकर यांनी अधिक्षक अभियंता राख यांना फोनवरून लोकांच्या उद्रेकाची कल्पना दिली.यावेळी आपण मुंबईला मिटींगला जात असून तुम्हाला लेखी हमी देतो असे सांगितले मात्र संतप्त ग्रामस्थांनी ऐन सिजन मध्येच व्यापारी आणि ग्रामस्थांचे महिन्याभराचे नुकसान झाले.त्याचा खर्च आणि वीज बिल माफ म्हणून लिहून देत असाल तर द्या नाहीतर नको असा आक्रमक पवित्रा घेतला.याबाबत समाधान कारक उत्तर न दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना आपल्या सोबत घेत बाजारपेठ ते आचरा तिठा पर्यंत या विद्यूत मंडळाचे करायचे काय खाली मुंडी वर पाय,विद्यूत मंडळ हायहाय, ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणा-या मंडळाचा निषेध आदी घोषणा देत मिरवणूकच काढली.आचरा तीठा येथे आलेल्या आंदोलकांनी आचरा तिठा येथे भर चौकातच ठिय्या मारत रास्ता रोको केला.यामुळे तिठा भागातून कणकवली, मालवण, देवगड,आचराबंदर जाणारी वाहतूक काही काळ बंद पडल्याने चारी बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.याबाबत आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी आंदोलन कर्त्यांची समजून काढून वरीष्ठ विद्यूत अधिकाऱी सचिन म्हेत्रे यांना बोलावून घेत आचरा तिठा येथील रास्ता रोको थांबविण्याचा प्रयत्न केला.याबाबत सरपंच यांनी पर्यटकांचा आणि वाहनचालकांचा ऐन दुपारी होणारा त्रास लक्षात घेऊन आंदोलकांना समजावून ठिय्या आंदोलन मागे घेतले.मात्र मालवण येथून आलेल्या उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांच्याशी आचरा बाजारपेठ कार्यालयात बैठक घेत चर्चेतून समस्या निवारण्याचा प्रयत्न केला.यावेळी सरपंच जेरॉन फर्नांडिस,राजन गावकर,जयप्रकाश परुळेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,मांगिरीष सांबारी,पं.स.सदस्य गणेश तोंडवळकर,चंदू सावंत, पंकज आचरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी समर्पक उत्तर देत नसल्याने ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले.यावेळी अधिकारी उर्मट उत्तरे देत असल्याचे सांगत नितीन घाडी,विक्रांत आचरेकर आदी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला.वाढता उद्रेक रोखण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न सुरू केला.यामुळे झालेल्या धावपळीत कार्यालयातील लाकडी पार्टीशिअनचे नुकसान झाले.

यादरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी आढाव हेही आंदोलन स्थळीदाखल झाले होते शेवटी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस,राजन गांवकर आदींनी समस्या तातडीने मार्गी लावा नाहितर पुन्हा यापेक्षा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला ‌सकाळी दहा पासून सुरू झालेले आंदोलन दुपारी तीन वाजेपर्यंत सहातासाच्यावर सुरूच होते.

 

*चौकोनात*

या आंदोलनात आलेल्या हिर्लेवाडी येथील महिला किर्ती पेडणेकर यांनी २०२१मध्ये घराशेजारी धोकादायक झालेल्या वीज लाईन बदलण्यासाठी वारंवार पत्र व्यवहार केलं होते गेली चार वर्षे सतावणा-या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाचा धसका घेत आंदोलनानंतर तातडीने धोकादायक लाईन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सचिन गुळगुळे यांच्या कडून सांगण्यात आले.

 

 

 

 

 

सरपंच जेरोन फर्नांडिस, जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी, पंस सदस्य गणेश तोंडवळकर,उपसरपंच संतोष मिराशी, राजन गांवकर,जयप्रकाश परुळेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,उपाध्यक्ष मंदार सांबारी ग्रा.स पंकज आचरेकर, चावल मुजावर,अनुष्का गांवकर,किशोरी आचरेकर,श्रूती सावंत, ग्रामस्थ मंगेश टेमकर, अभय भोसले, पाडूरंग वायंगणकर, राजन पांगे,

,चंदू सावंत, अजित घाडी, चंदन पांगे,मंगेश मेस्त्री, विजय कदम,विकास कावले,विकास साटम,नारायण कुबल शाम घाडी,हर्षद धुरी,शैलेश मुणगेकर,मांगिरीष सांबारी, शंकर मिराशी, नितीन घाडी, विक्रांत आचरेकर,सुरेंद्र कुबल यांसह बहुसंख्य पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.