जि. प. सदस्य प्रमोद गांधी यांचे कुंभारवाडी ग्रामस्थानी मानले आभार
गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील वडद कुंभारवाडी येथील रस्त्याला स्वखर्चातून खडीकरण करून जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांनी येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर केली आहे.
गेली अनेक वर्ष शिवशक्ती विकास मंडळ कुंभारवाडी येथील ग्रामस्थ सदर रस्त्याची श्रमदानातून डागडुजी करत होते.मुख्य म्हणजे सदरचा रस्ता हा 23 नंबरला नसल्याने व सातबारा मध्ये देखील अनेक तांत्रिक अडचणी असल्याने येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्याकडे सदर रस्त्याच्या खडीकरण करण्यासाठी या मागणी केली होती. प्रमोद गांधी यांनी ग्रामस्थांची ही मागणी तत्काळ मंजूर करत स्वखर्चातून 100 मीटर रस्ता खडीकरण करून दिला याबद्दल येथील ग्रामस्थांनी त्यांचा नुकताच यथोचित सन्मान केला.या कामामुळे येथील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. या सत्कारावेळी मनसेचे पदाधिकारी तसेच कुंभारवाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.













