दापोलीत कै. डॉ. प्रशांत किसन मेहता स्मृती द्वितीय आरोग्यवर्धिनी उपक्रम उत्साहात संपन्न

दापोली(प्रतिनिधी): –

कै. डॉ. प्रशांत किसन मेहता यांच्या पावन स्मृतीस अभिवादन म्हणून दशानेमा गुजर युवक संस्था, दापोली (रजि.) यांच्या वतीने आयोजित “द्वितीय आरोग्यवर्धिनी” हा समाजोपयोगी उपक्रम, नुकताच श्री राधाकृष्ण मंदिर, दापोली येथे अत्यंत उत्साहपूर्ण व सेवाभावी वातावरणात संपन्न झाला.

या उपक्रमांतर्गत भव्य महारक्तदान शिबिर व मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजहिताची जाणीव आणि मानवसेवेचा वसा जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. तब्बल १४४ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला, तर ५६ नागरिकांनी मोफत दंतचिकित्सा शिबिराचा लाभ घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात दापोली अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. जयवंतशेठ जालगावकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुधीर बुटाला, श्री. सचिन किसन मेहता व श्री. राहुल साबळे यांच्या हस्ते कै. डॉ. प्रशांत किसन मेहता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

उद्घाटन समारंभास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे सर, दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. कृपाताई घाग, पंचायत समिती सभापती उन्मेश राजे,पंचायत समिती सदस्य निलेश शेठ,
पंचायत समिती सदस्य भाऊ ईदाते,पंचायत समिती सदस्य नरेश घरटकर, नगरसेविका प्रिती शिर्के, डॉ. दिलीप जोशी, डॉ. अनिरुद्ध फडके, डॉ. विद्या दिवाण, डॉ. समिक्षा मेहता, श्री. श्रीराम माजलेकर, श्री. अरुण गांधी, श्री. प्रमोद तलाठी, श्री. संदीप दिवेकर, श्री. एम. आर. शेट्ये, डॉ. सुभाष चव्हाण, श्री. आशिष मेहता, श्री. महेश पटोलिया, ॲड.पंचायत समिती सदस्य समीर शेठ, श्री. समीर गांधी, श्री. मिलिंद शेठ, श्री. प्रदीप शेठ, श्री. समीर तलाठी, श्री. शिरीष मेहता, डॉ. वरुण मोदी, श्री. चंद्रशेखर शेठ, श्री. भूपेंद्र तलाठी, सौ. स्नेहल बुटाला, सौ. विशाखा साबळे, डॉ.कुलकर्णी, सौ. स्नेहल तलाठी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या महारक्तदान शिबिरासाठी सायन ब्लड बँक, मुंबई यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता यांनी त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच मोफत दंतचिकित्सा शिबिरासाठी डॉ. वरुण मोदी व योगिता डेंटल कॉलेज यांचे विशेष सहकार्य लाभले. यासाठी डॉ. कुणाल मेहता यांनी डॉ. वरुण मोदी, डॉ. पोळ मॅडम व त्यांच्या संपूर्ण सहकारी टीमप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर दशनेमा गुर्जर मंडळ दापोली यांनी राधाकृष्ण मंदिर हॉल सदर समाज हिताच्या कार्यक्रमासाठी मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ सदस्य व हितचिंतक यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, उपाध्यक्ष श्री. निकेत मेहता, सचिव श्री. मयुरेश शेठ, कार्याध्यक्ष व प्रकल्प संचालक श्री. ऋषिकेश तलाठी, खजिनदार श्री. स्वप्निल मेहता यांनी पुढाकार घेतला. याशिवाय संस्थेचे पदाधिकारी श्री. सिद्धेश शेठ, श्री. परेश बुटाला, श्री. साहिल कडके तसेच सदस्य सीए ऋषिकेश शेठ, प्रा. तेजस मेहता, श्री. अभिजीत तलाठी, श्री. संदेश मेहता, श्री. स्वामी बुटाला, श्री. सार्थक बुटाला, श्री. अमित मेहता, श्री. पार्थ तलाठी श्री. सुरज मेहता यांनी विशेष परिश्रम घेतले.

मानवसेवा हीच ईश्वरसेवा या उदात्त भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे कै. डॉ. प्रशांत किसन मेहता यांच्या समाजाभिमुख कार्याला भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. भविष्यातही असे लोकहितकारी व आरोग्यवर्धक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.